आंदेकरच्या खुनानंतर बारा तासातच आणखी एकाचा खून
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच बारा तासांच्या आत शहरात आणखी एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री अडीच वाजता कोयत्याने वार करीत एकाची हत्या केली. पोलीस चौकीपासून तीनशे मीटरच्या अंतरावर हा प्रकार घडला.

वासुदेव कुलकर्णी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव. फुरसुंगी सासवड रोड पोलिस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. कोयत्याने वार करून अतिशय निर्घृण खून करण्यात आला आहे. कुलकर्णी हा एक फायनान्स कंपनी चालवत होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान हा कोण नेमका कोणत्या कारणावरून झाला, मारेकरी कोण होते, मयत व्यक्ती त्या परिसरात एवढ्या उशिरा काय करत होते, तपास पोलिसांकडून केला जात आहे.