स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात देशाला जागतिक स्तरावर भक्कम करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला दिशा देणारी आणि विविध क्षेत्रांत भारताला जागतिक स्तरावर नेत्याच्या भूमिकेत प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण उद्दिष्टे मांडली. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी देशाला संबोधन केले. सलग अकराव्या वेळेस स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करणारे पंतप्रधान ठरले आहेत.
दिल्ली (१५ ऑगस्ट, २०२४): भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला दिशा देणारी आणि विविध क्षेत्रांत भारताला जागतिक स्तरावर नेत्याच्या भूमिकेत प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण उद्दिष्टे मांडली. स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी देशाला संबोधन केले. सलग अकराव्या वेळेस स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करणारे पंतप्रधान ठरले आहेत.
पंतप्रधानांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
-
जीवन सुगमता मोहीम: पंतप्रधान मोदी यांनी मिशन मोडमध्ये ‘जीवन सुगमता’ सुधारण्याचा आपला दृष्टीकोन मांडला. त्यांनी शहरी भागातील जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी पद्धतशीर मूल्यांकन आणि पायाभूत सुविधा व सेवांमध्ये सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली.
-
नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन: पंतप्रधानांनी प्राचीन नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला, ज्यामुळे भारताला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून स्थान मिळेल. याच प्रयत्नांतर्गत २०२४ मध्ये नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
-
चिप-सेमीकंडक्टर उत्पादन: पंतप्रधानांनी भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचे आणि तांत्रिक स्वयंपूर्णता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
-
कौशल्य भारत: २०२४ च्या अर्थसंकल्पात, पंतप्रधानांनी भारतातील तरुणांना प्रशिक्षित करून देशाला जगाची कौशल्य राजधानी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांचा उल्लेख केला.
-
औद्योगिक उत्पादनाचे केंद्र: भारताच्या अफाट संसाधनांचा आणि कुशल कर्मचाऱ्यांचा उपयोग करून, पंतप्रधानांनी देशाला जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतरित करण्याची कल्पना मांडली.
-
"डिझाइन इन इंडिया, डिझाईन फॉर द वर्ल्ड": पंतप्रधानांनी भारताच्या स्वदेशी डिझाईन क्षमतेवर भर दिला आणि या क्षमतेचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने तयार करण्याचे आवाहन केले.
-
जागतिक खेळणी बाजारपेठेत अग्रणी: भारताच्या समृद्ध वारशाचा आणि साहित्याचा उपयोग करून खेळणी उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणण्याची आणि भारतीय व्यावसायिकांनी जागतिक खेळणी बाजाराचे नेतृत्व करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
-
हरित रोजगार आणि हरित हायड्रोजन मोहीम: पंतप्रधानांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हरित नोकऱ्यांच्या महत्त्वावर भर दिला आणि हरित वाढ व नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली.
-
स्वस्थ भारत मिशन: २०४७ मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘स्वस्थ भारत’ या मार्गावर चालण्याची गरज पंतप्रधानांनी मांडली.
-
राज्यस्तरीय गुंतवणूक स्पर्धा: पंतप्रधानांनी राज्य सरकारांना गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्पष्ट धोरणे विकसित करण्याचे आवाहन केले.
-
जागतिक मानकानुरुप भारतीय मानके: पंतप्रधानांनी भारतीय मानकांनी आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत होण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे, असे सांगून गुणवत्तेच्या वचनबद्धतेबद्दल बोलले.
-
हवामान बदलाची उद्दिष्टे: २०३० पर्यंत ५०० गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
-
वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार: पंतप्रधानांनी देशातील वैद्यकीय शिक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षांत ७५,००० नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याची योजना जाहीर केली.
-
राजकारणात नवतरुणांचा समावेश: पंतप्रधानांनी राजकारणात तरुणांना, विशेषतः कौटुंबिक वारसा नसलेल्या तरुणांना, मोठ्या प्रमाणात सामील करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे घराणेशाही आणि जातिवाद या विघातक रुढींना आव्हान देता येईल.