डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पेट्रोल डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश एकूण 48 लाख 01 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काळभोर पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या पेट्रोल डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश एकूण 48 लाख 01हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध पेट्रोल डिझेल चोरीचे अनुषंगाने मा.सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांचे आदेशान्वये दिनांक- 10/09/2024 रोजी सहा.पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर राजु महानोर, पोलीस अंमलदार ढमढेरे, शिवाजी जाधव असे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हयांना प्रतिबंधकरणचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एचपीसीएल व आय. ओ.सी. एल.कपंनी कदम वाकवस्ती ता. हवेली येथुन पेट्रोल व डिझेल भरुन टॅकर पेट्रोल पंपाकडे जात असतात त्यावेळी त्यांना एचपीसीएल व आय. ओ.सी.एल.कंपनीकडुन प्रवास करण्याचा मार्ग,वेळ नियोजित केलेली असते. तसेच सदर टॅंकरमधुन ते टँकर कंपनीच्या बाहेर गेल्यानंतर इंधन बाहेर काढता येवु नये याकरीता टँकरला कंपनीचे लॉक करुन कंपनीचे बाहेर पाठविले जाते. असे असताना, मौजे कुंजीरवाडी थेऊर फाटयाजवळ ता. हवेली जि. पुणे येथील पुणे सोलापुर असा दुतर्फा वाहना-या महामार्गाचे दक्षिणेस रिकाम्या जागेतील पत्र्याच्या शेडजवळ टँकर घेवुन जावुन त्यामधुन पेट्रोल डिझेल या ज्वलनशील इंधन बॅरेल मध्ये काढीत आहे अशी मजकुराची बातमी मिळाल्याने लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस ठाणे श्री.राजेंद्र करणकोट, यांना कळविले असता, त्यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके, पोलीस अंमलदार वणवे, धुमाळ, विर, पाटील यांना छापा कारवाईचा आशय समजावुन सांगुन कारवाई करण्याचे आदेशित केले.
सदर ठिकाणी आयओसिएल व एचपीसिएल असे एकुण 03 इंधन टॅकर, त्या टॅकर मधुन इलेक्ट्रिक मोटारीचे साहाय्याने डिझेल बॅरेल मध्ये काढीत असताना मिळुन आले. सदर छापा कारवाईमध्ये एकुण 1620 लिटर डिझेल मिळुन आल्याने जप्त करण्यात आलेले आहे. त्यामुळ सदर पुढिल कायदेशिर कारवाई करीता आयओसिएल कंपनीचे अधिकारी व परिमंडळाचे पुरवठा अधिकारी यांना समक्ष बोलावुन घेऊन
सदर घटनेबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 440/2024 बी. एन.एस.कलम 111, 112, 303(2), 61(2), 316(3), 287, 288स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 कलम 3, 4, 5, 6 सह अत्यावश्यक वस्तु अधि. कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील अवैधरित्या पेट्रोल/डिझेलची चोरी करणारे इसमांची नावे शुभम सुशील भगत वय 23 वर्षे, रा.बोरकरवस्ती. थेऊरफाटा, ता. हवेली जि.पुणे, तृशांत राजेंद्र सुंभे वय- 31 वर्षे रा. बॅक ऑफ बडोदाजवळ, थेऊरु फाटा ता. हवेली जि. पुणे, रवी केवट वय 25 वर्षे रा. बोरकरवस्ती ,माळीमळा ता. हवेली जि. पुणे, विशाल सुरेश गोसावी वय 30 वर्षे रा वाणीमळा थेऊर फाटा ता. हवेली जि. पुणे, किरण हरीभाउ आंबेकर वय 31 वर्षे रा. कदमावाकवस्ती ता.हवेली जि.पुणे, रोहीत कुमार वय 21 वर्षे रा.बोरकरवस्ती माळीमळा ता.हवेली जि. पुणे असे मिळुन आले टॅकर मालक पाहिजे आरोपी याचे सांगणेवरुन पेट्रोल/डिझेलची चोरी करीत असल्याचे सांगितले आहे इतर एक पाहिजे आरोपी हा चोरीचे पेट्रोल/डिझेल काळया बाजारात विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त झालेली आहे.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रार्देशिक विभाग, पुणे शहर, श्री.मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त ,परिमंडळ 5, पुणे शहर,श्री.आर.राजा, मा.पोलीस पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा.सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर श्री.अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.राजेंद्र करणकोट, सहा. पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री राजु महानोर, पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके, लोणी काळभोर पो. स्टे, पोलीस अंमलदार, रामहरी वणवे, मंगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, शिवाजी जाधव, संदीप धुमाळ, बाजीराव विर, योगेश पाटील यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली.