प्रशांत जगताप यांचा गाठीभेटींवर भर

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी निवडणुकीच्या निमित्ताने गाठीभेटीचा धडाका लावला आहे. ठिकठिकाणी जगताप यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला जात आहे.

प्रशांत जगताप यांचा गाठीभेटींवर भर

पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी निवडणुकीच्या निमित्ताने गाठीभेटीचा धडाका लावला आहे. ठिकठिकाणी जगताप यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला जात आहे.

प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी प्रचारदौऱ्याच्या निमित्ताने कात्रज भागात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. नमेशदादा बाबर, मा. नगरसेविका अमृताताई अजितदादा बाबर, मा. नगरसेविका कल्पनाताई थोरवे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली. प्रसिद्ध उद्योजक राजकुमार लोढा, महावीर लोढा यांच्याशीही संवाद साधला.

तसेच, कोंढवा येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अल्ताफभाई शेख, दिलशाद अन्सारी, शयान अन्सारी यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली. या वेळी संपूर्ण समाज प्रशांत जगताप यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.

‘स्वाभिमानाच्या लढाईत ज्येष्ठ नेते, सहकारी यांच्याकडून मिळणारे बळ हे निश्चितच विजय मिळवून देणारे आहे,’ असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

.........

विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा

हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना भारतीय मुस्लिम ओबीसी संघटना, जनशक्ती विकास संघ, समस्त वाल्मिकी समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

........

‘एसआरपीएफ’च्या पोलिस खेळाडूंचा सन्मान

वानवडीमधील एसआरपीएफ गट क्र. २ येथील जवानांनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशाबद्दल प्रशांत जगताप यांनी पोलिस बांधवांची भेट घेऊन अभिनंदन करीत कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.