अर्ज मागे घेत रिपाइं', काँग्रेस, शिवसेना उमेदवारांचा प्रशांत जगताप यांना पाठिंबा

अर्ज मागे घेत रिपाइं', काँग्रेस, शिवसेना उमेदवारांचा प्रशांत जगताप यांना पाठिंबा
अर्ज मागे घेत रिपाइं', काँग्रेस, शिवसेना उमेदवारांचा प्रशांत जगताप यांना पाठिंबा

प्रशांत जगताप यांना हडपसरमध्ये वाढता पाठिंबा

'रिपाइं', काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांन अर्ज मागे घेत दिला महाविकास आघाडीला पाठिंबा

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (सोमवारी) शेवटचा दिवस होता. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अनेकांनी आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

या पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख समीर तुपे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे धडाडीचे नेतृत्व माजी नगरसेवक ॲड. अय्युब शेख, तसेच सय्यदभाई यासिन यांनी अपक्ष म्हणून भरलेला आपला अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार केला. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, तसेच इम्रानभाई शेख, अपक्ष उमेदवार नसीमभाभी शेख, किसन आदमाने यांनीही आपला अर्ज मागे घेत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला. मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र राज्य संघटनेने जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, "हडपसरमधील निष्ठावान शिवसैनिकांची ताकद मला पुढील संघर्षात बळ देणारी आहे. रिपब्लिकन चळवळीतील स्वाभिमानी, तसेच पुरोगामी व समतेच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला पाठिंबा ऊर्जादायी आहे. महाविकास आघाडीच्या सर्वसमावेशक, विकसनशील विचारांवर विश्वास ठेवत, समतेच्या विचारांना आंबेडकरी शक्तीची ताकद देत हे सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिल्याने येथे नक्कीच परिवर्तन घडणार, असा मला विश्वास आहे. हडपसरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही एकजूट पुढेही कायम राहील. पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार मानतो."

विविध समाजघटकांशी संवाद

प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील सेंट पॅट्रिक टाऊन सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधला. हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, तसेच परिसरात सामाजिक सलोखा जपण्यासाठी येत्या काळात काम करायचे आहे. त्यामुळे 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन जगताप यांनी मतदारांना केले.