मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुदत वाढ  

 महिलांनी अजून अर्ज भरले नसतील, त्या सर्व महिलांनी अर्ज भरून घ्यावेत नागपूर : नागपूर येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सप्टेंबर महिन्यात देखील सुरू राहणार आहे, असे जाहीर केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुदत वाढ    
Cm Eknath shinde

या योजनेसाठी महिलांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला नव्हता त्यांचे अर्ज भरले जाणारच आहे शिवाय ज्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या ते रिजेक्ट केले होते असे अर्ज देखील परत भरून त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा याची देखील काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये याची पूर्ण जबाबदारी हे सरकार घेत आहे.यावेळी जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा फायदा घ्यावा, आणि ज्या महिलांनी अजून अर्ज भरले नसतील, त्या सर्व महिलांनी अर्ज भरून घ्यावेत,असे आवाहन यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी महिलांना केले.या योजेनेपासून कुठलही महिला वंचित राहू नये म्हणून मुदतवाढ केल्याबद्दल डॉ.नीलम गोऱ्हे यांनी माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.