विनेश फोगाटचा दहीहंडीत सन्मान; बी. टी. कवडे रोड दहीहंडी उत्सवाकडून पदकाची प्रतिकृती
ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलेल्या विनेश फोगाटच्या सन्मानार्थ सारा देश उभा राहिल्याचे आपण पहिले. याचीच प्रचिती दहीहंडी उत्सवातून पाहायला मिळाली.
ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलेल्या विनेश फोगाटच्या सन्मानार्थ सारा देश उभा राहिल्याचे आपण पहिले. याचीच प्रचिती दहीहंडी उत्सवातून पाहायला मिळाली. अखिल बी . टी कवडे रोड दहीहंडी उत्सव मंडळाने विनेश फोगाटच्या सोबत सारा देश असल्याचे संदेश झळकावले होते. हंडीला विनेश फोगाटचे नाव देत ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकाची प्रतिकृती करण्यात आली होती.अखिल बी . टी कवडे रोड दहीहंडी उत्सव मंडळ दरवर्षी अनोख्या देखाव्यासाठी भागात प्रसिद्ध आहे. जिवंतपणा आणणारे भव्य देखावे या मंडळाकडून केले जातात. गतवर्षी सादर केलेला चंद्रयानाचा देखावाही व्हायरल झाला होता.
'विनेश फोगाट यांनी आपल्या देशासाठी खूप उत्तम खेळ केला. मात्र तांत्रिक कारणावरून त्यांना बाद ठरवण्यात आले. यामुळे कोणत्याही खेळाडूचा आत्मविश्वास कमी होऊ नये त्यामुळे, साऱ्या देशवासीयांनी त्यांच्या सोबत आहोत हा संदेश द्यावा या हेतूने आम्ही हा देखावा सादर केले असल्याचे, आयोजक संकेत कवडे यांनी सांगितले. जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या माध्यमातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते.