नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचे दुःखद निधन
नारायणपूर येथील हजारो भाविकांचे गुरुवर्य म्हणून ओळखले जाणारे नारायण महाराज यांचे आज निधन झाले.
नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचे दुःखद निधन
पुणे: पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील परमपूज्य श्री सद्गुरू नारायण महाराज यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून त्यांचे शिष्य आणि भक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सद्गुरू नारायण महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर, दुपारी ३ वाजता मंदिरातून अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी ४ वाजता संज्ञकुंडाजवळ त्यांचे अग्नीसंस्कार होणार आहेत. शिवदल नाम २०० कोटी यज्ञकुंड, नारायणपूर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सर्व भक्तांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.